(म्हणे) ‘गलवान खोर्‍यातील संघर्षात आमचे ४ सैनिक मृत्यू पावले !’

चीनची स्वीकृती देतांनाही पुन्हा खोटारडेपणा !

या संघर्षात चीनचे ४० ते ४५ सैनिक ठार झाल्याचा दावा अमेरिका, रशिया आणि अन्य देश यांनी त्यांच्या गुप्तचरांच्या हवाल्याने केला असतांना कालपर्यंत कुणीही ठार झाला नसल्याचा दावा करणार्‍या चीनची ही स्वीकृती म्हणजे साळसुदपणाचा आव आणणे होय, हे वेगळे सांगायला नको !

बीजिंग (चीन) – चीनने लडाखमधील गलवान खोर्‍यात १५ जून २०२० च्या रात्री चीन आणि भारत यांच्या सैन्यात झालेल्या संघर्षात चीनने त्याचे एका अधिकार्‍यासह ४ सैनिक ठार झाल्याची स्वीकृती ८ मासांनी दिली आहे. या संघर्षात भारताच्या एका कर्नलसह २० सैनिक हुतात्मा झाले होते. पँगाँग सरोवर परिसरातून सैन्य मागे घेतल्यानंतर चीनने ही स्वीकृती दिली आहे. या ४ सैनिकांना चीनने मरणोत्तर पदक दैऊन गौरवल्याचेही चीनने सांगितले.

गलवान खोरे

चीनच्या ‘पीपल्स डेली’ या सरकारी वर्तमानपत्राने याविषयीचे वृत्त दिले आहे; मात्र चीनचे दुसरे सरकारी दैनिक ‘ग्लोबल टाइम्स’च्या वृत्तानुसार ५ सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे. चौघांचा मृत्यू संघर्षात झाला, तर एकाचा मृत्यू नदीत वाहून गेल्याने झाल्याचे यात म्हटले आहे.

INDIA-CHINA FACEOFF: चीन में सोशल मीडिया पर गलवान में मारे गए सैनिकों की कब्रें वायरल

(सौजन्य : Punjab Kesari TV)