पाकच्या बलुचिस्तानमध्ये अज्ञातांच्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार

पाकच्या बलुचिस्तानमध्ये अज्ञातांनी पाकच्या सुरक्षादलाच्या चौकीवर केलेल्या गोळीबारात पाकच्या अर्धसैनिकदलाचे ४ सैनिक ठार झाले. येथील कोहलू जिल्ह्यातील कहान भागात ही घटना घडली.

अभिनेत्री दीया मिर्झा यांनी स्वतःच्या विवाहामध्ये कन्यादान परंपरा वगळली !

कन्यादान करणार्‍या व्यक्तीच्या मागील १२ पिढ्या, पुढच्या १२ पिढी आणि स्वतःची १ पिढी यांचा उद्धार होतो, असे धर्मशास्त्र सांगते. मात्र फुकाचा पुरोगामीपणा मिरवण्यासाठी अशी टूम सध्या निघाली आहे. हिंदूंनी यापासून सावध रहावे !

राहुल गांधी यांच्या भाषणाच्या वेळी मुसलमानांनी उपस्थित रहाण्यासाठी इमामाकडून फतवा !

काँग्रेससाठी अशा प्रकारचे किती फतवे काढण्यात आले, तरी आता काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे !

कुंभपर्वाच्या कालावधीत केलेल्या साधनेचे १ सहस्र पटींनी फळ मिळत असल्याने धर्मप्रसाराच्या सेवेत (समष्टी साधनेत) सहभागी व्हा !

११ मार्च २०२१ ते ३० एप्रिल २०२१ या काळात हरिद्वार (उत्तराखंड) येथे महाकुंभपर्व असणार आहे. यामध्ये उत्तराखंड शासनाने १ ते ३० एप्रिल या कालावधीत भाविकांसाठी कुंभपर्व कालावधी घोषित केला आहे.

धारिष्ट्य असेल, तर भारतात नव्हे, तर पाकिस्तानमध्ये खलिस्तान बनवा ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, राष्ट्रवादी विचारवंत  

हिंदु सेवा परिषदेच्या वतीने १५ फेब्रुवारी या दिवशी श्री सरस्वतीदेवीचे पूजन आणि व्याख्यानमाला यांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कर्नल आर्.एस्.एन्. सिंह आणि हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. श्रीराम काणे यांनीही संबोधित केले.

चीनची स्वीकृती !

गतवर्षी कोरोना काळात चीनने गलवान खोर्‍यात केलेल्या आगळीकीला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले होते. या वेळी भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले, तर चीनकडील ३५ ते ४० जण ठार झाले होते; मात्र चीनने आमच्या सैन्याची काहीच हानी झाली नाही

किल्ले रायगडावर शिवजयंती आणि छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक उत्साहात साजरा !

छत्रपती संभाजी महाराज यांचा तिथीनुसार ३४७ वा राज्याभिषेक सोहळा, तर दिनांकाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ शिवजयंती एकाच दिवशी आली आहे. राज्याभिषेक सोहळ्यासमवेत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

बॉम्बचा बंगाली कारखाना !

बंगालमध्ये एका राज्यमंत्र्यावर ते रेल्वेस्थानकावर आल्यावर बॉम्बफेक होते आणि ते घायाळ होतात, यातून बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वातच नसल्याचे लक्षात येते. महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या राज्यमंत्र्यावर आक्रमण झाल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तोंड उघडत या बॉम्ब आक्रमणामागे भाजपचा हात असल्याचे म्हटले आहे.

कोरोनाशी लढतांना छत्रपती शिवरायांची प्रेरणा आणि जिद्द आम्हाला मिळते ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

छत्रपती शिवराय आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. छत्रपती दैवत का आहेत, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा आणि जिद्द आम्हाला मिळत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

मुंबई महानगरपालिकेकडून धडक मोहीम

मॉल, रेल्वेस्थानके, समारंभ, हॉटेल आदी ठिकाणी विविध पथके मास्क घालणे बंधनकारक असल्याचे प्रबोधन करून न घालणार्‍यांना दंडही करण्यात येत आहे. जम्बो कोविड सेंटरच्या सुविधा चालू करण्यात आल्या आहेत, असे महापौरांनी सांगितले.