इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा अर्जामध्ये विद्यार्थ्यांच्या उल्लेखामध्ये ‘हिंदु’ धर्माचा पर्यायच नाही

हिंदु धर्माचा उल्लेख करून त्यामध्ये अन्य कुणाला समभाग अपेक्षित आहे, याची टीपही अर्जात देता आली असती. तसे न करता बहुसंख्य हिंदु धर्माला डावलून त्याऐवजी ‘नॉन मायनॉरिटी’ असा हेतुपुरस्सर उल्लेख करणाऱ्यांचा हिंदुद्वेष यातून उघड होत आहे.

धुळे येथे पोलिसांनी धर्मांधांकडून ३१ तलवारी कह्यात घेतल्या : दोघांना अटक

तलवारींचा साठा मालेगावातून आणल्याचे उघड – या प्रकरणाचा मालेगावशीही संबंध येत असल्याने पोलिसांनी वरवरची कारवाई न करता याची पाळेमुळे खोदून धर्मांधांविरोधात कठोरात कठोर कारवाई करायला हवी !

महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘शक्ती’ कायद्याला मान्यता

महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात जलदगतीने कारवाई व्हावी, यासाठी ‘शक्ती’ कायदा संमत ! या कायद्याच्या अंतर्गत जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला २१ दिवसांत शिक्षा करण्याची तरतूद असणार आहे.

धर्मांधांकडून खारघर येथील गोशाळेतील गायींची दुसर्‍यांदा चोरी

पहिल्या चोरीच्या प्रकरणात कर्तव्यचुकार पोलिसांनी कारवाई न केल्याचा परिणाम !

अकोला येथील वारकरी संघटनांचे आमरण उपोषण मागे !

१०० भाविकांच्या उपस्थितीत भजन आणि कीर्तन यांकरिता अनुमती देण्यात यावी,या मागणीसाठीचे वारकरी संघटनांचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले.

राज्यातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून ३१ जानेवारीपर्यंत स्थगिती

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सांगलीच्या सरकारी घाटावर महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम, १ टन कचरा गोळा

सांगलीच्या कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबवली. यात घाटाच्या परिसरातून १ टन कचरा गोळा करण्यात आला. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही मोहीम राबवण्यात आली.

राज्यात कोरोनाच्या लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्‍चित

आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी १०० जणांना लस दिली जाईल.

सोलापूर येथील तलाव आणि मैदानाच्या नावांमध्ये सुधारणा करा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महापौर आणि पालिका आयुक्त यांना निवेदन

गुरुदेवा, संध्याचा करावा सत्वर उद्धार ।

कार्तिक कृष्ण पक्ष द्वादशी (११.१२.२०२०) या दिवशी रामनाश्री आश्रमात सेवा करणार्‍या कु. संध्या माळी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची आई सौ. विमल पुंडलिक माळी यांनी लिहिलेली कविता येथे दिली आहे.