न्यूयॉर्क (अमेरिका) – न्यूयॉर्क राज्यातील क्वीन्स शहरात १ जानेवारीच्या रात्री ‘अमेझुरा नाईट क्लब’मध्ये झालेल्या गोळीबारात ११ जण घायाळ झाले. गोळीबार करणार्याने १२ वर्षांची मुलगी आणि तिच्या आईचा ढाल म्हणून वापर केला. गोळीबारात मुलगी आणि आई दोघेही घायाळ झाले. घायाळांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
सध्या न्यूयॉर्क पोलिसांनी या घटनेसंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. आरोपीविषयीही कोणती माहिती मिळालेली नाही. अमेरिकेत गेल्या २४ घंट्यांतील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. याआधी लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात एका व्यक्तीने नवीन वर्ष साजरे करणार्या लोकांवर पिकअप ट्रक चढवला होता. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण घायाळ झाले.