विद्यमान मंत्र्यांना प्रतिष्‍ठेची खाती न मिळाल्‍याने जुने स्‍वीय साहाय्‍यक सोडून गेले !

मुंबई – राज्‍यात मंत्र्यांच्‍या खातेवाटप पार पडले; पण प्रतिष्‍ठेची खाती विद्यमान मंत्र्यांना न मिळाल्‍याने आधीच्‍या सरकारमधील मंत्र्यांचे जुने स्‍वीय साहाय्‍यक सोडून गेले आहेत. त्‍यांनी त्‍यांच्‍या मूळ विभागाच्‍या नियुक्‍तीवर जाण्‍यास प्राधान्‍य दिले. मंत्र्यांचे खासगी सचिव, स्‍वीय साहाय्‍यक आणि विशेष कार्यकारी अधिकारी अन् कर्मचारी यांची नेमणूक मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या कार्यालयातून नावांना संमती मिळाल्‍यानंतरच होईल.

संपादकीय भूमिका

कामापेक्षा पदाला महत्त्व देणारे असे लोक काय कामाचे ?