सांगलीच्या सरकारी घाटावर महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम, १ टन कचरा गोळा

सांगलीच्या सरकारी घाटावर स्वच्छता करतांना स्वच्छता कर्मचारी

सांगली, १० डिसेंबर (वार्ता.) – सांगलीच्या कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबवली. यात घाटाच्या परिसरातून १ टन कचरा गोळा करण्यात आला. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही मोहीम राबवण्यात आली.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात सध्या ‘स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१’ साठी जोरदार सिद्धता करण्यात येत आहे. या मोहिमेत महापालिका कर्मचार्‍यांनी प्लास्टिक पिशव्याही गोळ्या केल्या आहेत. सरकारी घाटावर येणार्‍या नागरिकांनी त्यांच्याकडील कचरा महापालिकेच्या कचरापेटीत टाकावा आणि घाटाचे पावित्र्य राखावे, असे आवाहन स्वच्छता निरीक्षक प्रणील माने यांनी केले आहे. या स्वच्छता मोहिमेत मुकादम अमित शिंदे यांच्यासह स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते.