गुरुदेवा, संध्याचा करावा सत्वर उद्धार ।

कार्तिक कृष्ण पक्ष द्वादशी (११.१२.२०२०) या दिवशी रामनाश्री आश्रमात सेवा करणार्‍या कु. संध्या माळी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची आई सौ. विमल पुंडलिक माळी यांनी लिहिलेली कविता येथे दिली आहे.

कु. संध्या माळी

कु. संध्या माळी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

सौ. विमल माळी

धन्य धन्य गुरुदेव आम्ही ।
संध्याला जन्म दिला सनातन कुळी ॥ १ ॥

रक्षण केले तुम्ही तिचे जन्माआधीपासून ।
अनेक आपत्तींत अन् तिच्या रुग्णाईत स्थितीत ॥ २ ॥

पिवळ्या रंगाचे पोषाखच । ती नेहमी आम्हा मागतसे ।
आवडीचा रंग लेवूनी सूर्यफूल हे । सदा आनंदी रहात असे ॥ ३ ॥

नियमित शाळा, अभ्यास, शिस्त । स्वच्छता तिला प्रिय असे ।
वीणकाम, भरतकाम, चित्रकला ।  सुंदर रांगोळी काढतसे ॥ ४ ॥

खेळ, गायन, हस्ताक्षर यांत । नेहमी सहभाग घेत असे ।
गणेशोत्सव, शालेय स्पर्धा यांत । प्रथम क्रमांक मिळवत असे ॥ ५ ॥

मेंदीची तिला हौस भारी । विवाह असता कुणाकडे ।
घरी येऊनी सांगतसे मज । लवकर मेंदी भिजव गडे ॥ ६ ॥

कागदांचे कोन बनवूनी । दिवसभर मेंदी काढतसे ॥ ७ ॥

सण येता आनंद तिचा । गगनात मावत नसे ।
सर्वांच्या अंगणात रांगोळ्या काढूनी । चाळ सुशोभित करतसे ॥ ८ ॥

दही, दूध अन् तूप यांची आवड भारी । सात्त्विक भोजन करतसे ।
स्वयंपाकाची धडपड करी । पुरणाचे मांडे करतसे ॥ ९ ॥

तुमच्या कृपे मिळाली । आम्हा संगोपनाची सेवा ।
झाल्या असतील चुका । करतो क्षमायाचना देवा ॥ १० ॥

प्रार्थना तुमच्या चरणी गुरुदेवा । करतो माळी परिवार ।
संध्याचा करावा सत्वर उद्धार ॥ ११ ॥

– सौ. विमल पुंडलिक माळी, चाळीसगाव, जि. जळगाव. (५.१२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक