पुणे – महाराष्ट्र बांगलादेशी आणि रोहिंग्यामुक्त करायचा आहे. अवैधरित्या रहाणारे काही लोक अतिरेकी कारवायांना साहाय्य करतात. ही घाण आम्हाला राज्यात नको; कारण ते जिथे जातात, तो भाग घाण करतात. काही ठिकाणी मतदानामध्येही ते सहभागी होत आहेत. आमचे सरकार ही सर्व घाण स्वच्छ करण्याकडे लक्ष देत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये येत्या काळात एकही बांगलादेशी आणि रोहिंग्या दिसणार नाही, अशी चेतावणी मत्सव्यवसाय आणि बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिली. ते पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
बांगलादेशी घुसखोर मुसलमानांच्या समस्येवर तोडगा काढावा, तसेच त्यांची लवकरात लवकर देशातून हकालपट्टी करावी, यासाठी अनेक संघटना चळवळ राबवत आहेत. पोलीसही घुसखोरांच्या विरोधात कारवाई करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राणे बोलत होते.
राणे पुढे म्हणाले की, देशातील बांगलादेशी घुसखोर हे हिंदूंच्या सणांवर दगडफेक करतात. जर या विरोधात आवाज उठवला गेला आणि त्यासाठी गुन्हा नोंद झाला, तरी मी त्याला सामोरे जाण्यास सिद्ध आहे.