मॉन्टेनिग्रोमध्ये गोळीबारात १० ठार !

आरोपी अको मार्टिनोविक

पॉडगोरिका (मॉन्टेनिग्रो) – मॉन्टेनिग्रो या युरोप खंडातील देशात एका व्यक्तीने ‘बार आणि रेस्टॉरंट’मध्ये गोळीबार करून त्याच्याच कुटुंबातील सदस्यांसह १० जणांची हत्या केली. (युरोपसारख्या प्रगात खंडातील देशांमध्ये अशा अंदाधुंद गोळीबारासारख्या घटना घडतात, यावरून सामाजिक स्वास्थ्यासाठी साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते ! – संपादक) मृत्यू झालेल्यांमध्ये ‘बार आणि रेस्टॉरंट’चे मालक आणि त्यांची २ मुले यांचा समावेश आहे. आरोपीचे नाव अको मार्टिनोविक (वय ४५ वर्षे) असून त्याने आक्रमण केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी परिसरातील सर्व रस्ते बंद करून त्याचा शोध चालू केला आहे. आरोपी आक्रमणकर्त्याने आत्महत्या केल्याचे नंतर उघड झाले. मॉन्टेनिग्रोचे पंतप्रधान मिलोज्को स्पाजिक यांनी या गोळीबाराला भयंकर शोकांतिका म्हटले आहे.