मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कृती !
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील युनियन कार्बाइड कारखान्यातील विषारी कचरा ४० वर्षांनंतर हलवण्यास चालू झाले आहे. १ जानेवारीच्या रात्री ९ वाजता ३३७ मेट्रिक टन कचरा घेऊन १२ कंटेनर पिथमपूरकडे मार्गस्थ झाले. कडेकोट सुरक्षा आणि २५० किलोमीटर लांबीच्या ‘ग्रीन कॉरिडॉर’मधून (महामार्गामधून) कचरा पिथमपूरला पाठवला गेला आहे. युनियन कार्बाइडचा हा रासायनिक कचरा पिथमपूरच्या ‘रामकी एन्व्हायरो’ नावाच्या आस्थापनात जाळण्यात येणार आहे. हा विषारी कचरा ६ जानेवारीपर्यंत हटवण्याच्या सूचना मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने दिल्या होत्या.
२ डिसेंबर १९८४ च्या रात्री या कारखान्यातून झालेल्या वायूगळतीच्या दुर्घटनेत ३ सहस्रांहून अधिक लोकांचा जागीच मृत्यू झाला होता, तर नंतर ३० सहस्रांहून अधिक लोक मरण पावले होते.
संपादकीय भूमिका३० सहस्र लोकांच्या मृत्यू कारणीभूत ठरलेल्या या आस्थापनाच्या कारखान्यातील विषारी कचरा उचलण्यासाठी न्यायालयाला आदेश द्यावा लागणे, हे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! याला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई झाली पाहिजे ! |