पराग फडणीस यांची ‘श्रीकृष्‍ण जन्‍मभूमी संघर्ष न्‍यासा’च्‍या राज्‍य संयोजकपदी निवड !

श्री. पराग फडणीस

कोल्‍हापूर, २ जानेवारी (वार्ता.) – येथील प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. पराग फडणीस यांची ‘श्रीकृष्‍ण जन्‍मभूमी संघर्ष न्‍यासा’च्‍या राज्‍य संयोजकपदी निवड करण्‍यात आली आहे. याच्‍या नियुक्‍तीचे पत्र श्री. पराग यांना नुकतेच राष्‍ट्रीय अध्‍यक्ष श्री. दिनेश शर्मा (फलाहारी) आणि महाराष्‍ट्र-गुजरात-गोवा प्रदेशाध्‍यक्ष श्री. शंकर वराडकर यांनी दिले आहे. श्री. पराग यांनी कोल्‍हापूर येथे गेल्‍या काही वर्षांत हिंदुत्‍वासाठी, तसेच गोरक्षणासाठी मोठे कार्य केले असून प्रसंगी कारागृहवासही पत्‍करला आहे. श्री. पराग फडणीस हे वेळोवेळी हिंदु जनजागृती समितीच्‍या विविध उपक्रमांमध्‍ये सहभागी असतात.