नगर – येथील ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासक डॉ. जी.ए. रत्नपारखी यांना उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे ‘ज्योतिष महाकुंभ परिषदे’त मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे.
उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे ‘सातवी ज्योतिष महाकुंभ’ परिषद पार पडली. २ दिवस चाललेल्या या परिषदेत राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारे विद्वान आले होते. ‘राहुरी फॅक्टरी’ येथील डॉ. जी.ए. रत्नपारखी यांनी ज्योतिषशास्त्रावर मांडलेले अभ्यासपूर्ण विचार परिषदेत वेगळेपणाचा ठसा उमटवणारे ठरले. गेल्या ४० वर्षांपासून ज्योतिषशास्त्र, रत्नशास्त्र आणि वास्तूशास्त्र यांवर ते अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करत आहेत. त्यांना आजतागायत २९ राष्ट्रीय आणि ९ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.