चीनमधील उघूर मुसलमानांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात अमेरिकेत विधेयक संमत

चीनमधील उघूर मुसलमानांशी होणार्‍या भेदभावाच्या विरोधात अमेरिकेच्या संसदेमध्ये विधेयक संमत करण्यात आले.

सिंहभूम (झारखंड) येथे ३ नक्षलवादी ठार

झारखंड पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्याशी येथे झालेल्या चकमकीत ३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले, तर १ नक्षली घायाळ झाला.

देशात अवघ्या ९ दिवसांत आढळले कोरोनाचे तब्बल ५० सहस्र नवे रुग्ण !

देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ लाख ५४ सहस्र १४१ इतकी झाली आहे.

चीनचे सैनिक भारतीय सीमेतून मागे जात नाही, तोपर्यंत चीनच्या विधानांना काहीच अर्थ नाही ! – भारतीय सैन्य

जोपर्यंत चीन भारताच्या सीमेतून त्याचे सैनिक मागे घेत नाही, तोपर्यंत चीनच्या विधानांना काहीच अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय सैन्याच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

(म्हणे) कोरोनाचे संकट असतांनाही भाजप आणि संघ राममंदिराचे बांधकाम चालू करून हिंदुत्वाचे धोरण पुढे नेत आहेत !

एकीकडे जग कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे हिंदुत्वाचे धोरण पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अमेरिकेत कोरोनामुळे १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख २ सहस्र १०७ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनापासूनच्या बचावासाठीच्या उपकरणांच्या खरेदीमध्ये लाच घेतल्याच्या आरोपाप्रकरणी हिमाचल प्रदेशच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे त्यागपत्र

कोरोनापासूनच्या बचावासाठीच्या उपकरणांच्या खरेदीमध्ये लाच घेतल्याच्या आरोपावरून हिमाचल प्रदेशातील सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आरोग्यमंत्री डॉ. राजीव बिंदल यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले.

सुरक्षादलांच्या सतर्कतेमुळे पुलावामाप्रमाणे आक्रमण करण्याचा आतंकवाद्यांचा कट उधळला

जिहादी आतंकवाद्यांचा येथे पुन्हा एकदा गाडीच्या माध्यमांतून स्फोट घडवून मोठी हानी करण्याचा कट सुरक्षदलांच्या सतर्कतेमुळे उघळून लावण्यात आला.

पतंजलीकडून कोरोनावरील औषधाच्या वैद्यकीय चाचणीला प्रारंभ

नियामक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजलि आस्थापनाकडून कोरोनावरील उपचारांसाठीच्या औषधाची वैद्यकीय चाचणी चालू केली.

भाजपशासित उत्तराखंडमधील चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा कायदा मागे घेण्याचा आदेश द्या !

उत्तराखंडमधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा केलेला कायदा मागे घ्यावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र लिहून केली.