‘मोका’ अंतर्गत कारवाई झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका शमा मुल्ला यांचे नगरसेवकपद रहित

गुंडगिरी आणि अवैध व्यवसायात पुढे असलेल्या लोकप्रतिधींचा भरणा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जनतेचे काय भले होणार ?

पीएमसी बँक घोटाळ्याच्या प्रकरणी माजी आमदाराच्या मुलाला अटक

पीएमसी बँक घोटाळ्याच्या प्रकरणी भाजपचे माजी आमदार तारा सिंह यांचा मुलगा राजनीत सिंह यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. राजनीत सिंह पीएम्सी बँकेचे माजी संचालक आहेत.

सरकारी नोकर्‍यांमध्ये जाती आधारित पदोन्नती देणे घटनाविरोधी – मद्रास उच्च न्यायालय

सरकारी नोकर्‍यांमध्ये जातीच्या आधारावर पदोन्नती देणे घटनाविरोधी आहे, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.

मार्गांच्या विस्तारीकरणासह अन्य कामांसाठी रेल्वेला साडेतीन सहस्र कोटी रुपयांचे कर्ज मिळणार

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांच्या विस्तारीकरणासह अपघातप्रवण भागातील विशेष उपाययोजनांसाठी रेल्वेला साडेतीन सहस्र कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे.

समाज वेदांतसाक्षर झाल्यास समाजातून विकृती निघून जातील ! – पू.(डॉ.) श्रीकृष्ण देशमुख

आमच्या पूर्वजांनी प्रत्येक विषयावर अत्यंत सूक्ष्म, सखोल आणि विविधांगी विचार केला आहे. वेदांमधील बारकावे प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे. समाज वेदांतसाक्षर झाल्यास समाजातून विकृती निघून जातील.

ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के, तर उपमहापौरपदी पल्लवी कदम

ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या पल्लवी कदम यांची निवड झाली आहे.

यवतमाळ येथे शिवसेनेकडून रेल्वे क्रॉसिंगचे डांबरीकरण

यवतमाळ ते मुर्तीजापूर या रेल्वेमार्गावरून जाणारी छोटी रेल्वेगाडी गेले तीन-चार वर्षांपासून बंद आहे. वापरात नसलेल्या या रेल्वेमार्गावर दर्डा नाक्याजवळून जाणार्‍या रस्त्यावर (रेल्वे क्रॉसिंग) अनेक दिवसांपासून खड्डे पडले होते.

भारत सामर्थ्यशाली हिंदु राष्ट्र होईपर्यंत राष्ट्रपुरुषांच्या स्मृती जागृत ठेवा ! – सौ. क्रांतीगीता महाबळ, मुंबई उपाध्यक्ष, हिंदु महासभा

देशाची विटंबना आणि हिंदूंच्या हत्या बंद करून भारताला सामर्थ्यशाली हिंदु राष्ट्र करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपले सामर्थ्य अल्प पडत आहे; म्हणून भगवंताचे अधिष्ठान ठेवणे आवश्यक आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणे आणि हिंदूंना जागृत करणे, हे कार्य देशभरात आतापर्यंत झालेल्या सहस्रांहून अधिक हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

हिंदूंनी धर्माचे महत्त्व समाजाला सांगण्याची आवश्यकता ! – गुरुजी मुरलीकुमार, हासन, कर्नाटक

हिंदूच हिंदु धर्माचे महत्त्व समाजाला अभिमानाने सांगत नाहीत. हिंदूंनी ते सांगण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनाच धर्माविषयी ज्ञान नसते. त्यांना जेवढे ज्ञात आहे, तेवढे सांगायला हवे. धर्माविषयीची माहिती मुलांना सांगितल्यावरच त्यांच्यावर चांगले संस्कार होतील, असे प्रतिपादन हासन (कर्नाटक) येथील गुरुजी मुरलीकुमार यांनी केले.