प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे विभागाकडून आळंदी रस्त्यावर वारकर्‍यांसाठी बिस्किट वाटप !

पोलिसांकडून वारकर्‍यांचे प्रबोधन करण्यात येत होते. वाहतूक नियमांचे पालन करा प्रकारच्या सूचना जाहीरपणे देण्यात येत होत्या.

कोल्हापूरहून २७५ अतिरिक्त एस्.टी. बसगाड्या सोडणार !

आषाढी वारीसाठी २ ते ११ जुलै या कालावधीत कोल्हापूर विभागाकडून २७५ अतिरिक्त एस्.टी. बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या प्रत्येक आगारातून सोडण्यात येतील.

वारीत संतांच्या अभंगांचे चुकीचे दाखले देऊन अपप्रचार करू नये !

अपप्रचाराच्या माध्यमातून वारकर्‍यांची दिशाभूल करणार्‍या धर्मविरोधकांना वारीत येण्यास प्रतिबंधच करायला हवा !

२२ जूनला दिवे घाट माथ्यावर प्रवेशबंदी, उल्लघंन केल्यास कारवाई होणार !

प्रवेशबंदीचे उल्लंघन केल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६३ नुसार कारवाई करण्याचे आदेश पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिला आहे.

स्वच्छता आणि महिलांचे आरोग्य यांवर भर !

राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून पंढरपूरमध्ये स्वच्छता मोहीम !

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून १ सहस्र ते दीड सहस्र स्वयंसेवक येणार आहेत, तसेच सोलापूर जिल्ह्यामधून विविध ठिकाणचे अधिकारी, कर्मचारी त्यामध्ये सहभागी होतील. यांसाठी जवळपास २० ते २२ पथके आम्ही सिद्ध करणार आहोत.

‘टोकन दर्शन’ संख्येत वाढ करण्याचा निर्णय !

प्रत्येक घंट्याला दिल्या जाणार्‍या टोकन संख्येत १०० ने वाढ करतांना भाविकांना अधिक सुलभतेने आणि अल्प वेळेत दर्शन घेता यावे, हा हेतू आहे. ६ स्लॉटमध्ये प्रत्येकी १०० टोकन, अशा एकूण ६०० टोकन पासांची वाढ करण्यात येणार आहे.

ठाणे येथील आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकरणी पाचपाखाडी येथे रहाणार्‍या आकाश हटकर (वय २८ वर्षे) याला ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश देशमुख यांनी दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

शाळांनी पालक-विद्यार्थी यांच्यावर ठराविक विक्रेत्यांकडून शाळेसाठी लागणारे साहित्य घेण्याची सक्ती करू नये !’

‘नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतांना शाळेसाठी लागणारे साहित्य घेण्याची सक्ती करण्यात येऊ नये, तसेच असे काही होतांना आढळल्यास त्या शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात यावी’, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने देण्यात आले.