सार्वजनिक विहिरींच्या देयकासाठी ३७ सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी गटविकास अधिकार्‍याला अटक !

लाचखोरी रोखण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद हवी !

माघ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक उपाययोजना कराव्यात !

कोरोनाच्या संकटकाळात माघ वारी पार पडत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रथमोपचार केंद्राची उभारणी करावी.

महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील कोरोनाबाधित

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.

भोर (पुणे) येथील पोलीस ठाण्याच्या कोठडीतून २ आरोपी पसार

कह्यात असलेल्या आरोपींना सांभाळू न शकणारे पोलीस जिल्हा अथवा राज्याची कायदा-सुव्यवस्था कशी राखणार ?

बंगालमध्ये बॉम्बच्या आक्रमणात राज्यातील मंत्री झाकीर हुसेन घायाळ !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सरकारमधील मंत्रीही सुरक्षित नाहीत, यावरून तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उघड होते ! लोकशाहीत कार्यरत असे सरकार जनतेसाठी लज्जास्पदच !

वर्ष २०२१ च्या आय.पी.एल्. स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व पुन्हा चीनच्या विवो आस्थापनाला !

यातून बीसीसीआयची ढोंगी देशभक्ती दिसून येते ! बीसीसीआयला देशभक्तीपेक्षा पैसा अधिक महत्त्वाचा वाटत असल्याने त्याने पुन्हा चीनच्या आस्थापनाला प्रायोजकत्व दिले, अन्यथा त्याने भारतीय किंवा अन्य एखाद्या विदेशी आस्थापनाला ते दिले असते !

मासेमार महिलेने तमिळ भाषेत राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली असतांना भाषांतर करतांना तिने कौतुक केल्याचे सांगितले !

काँग्रेसचे मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी यांचा खोटेपणा ! जे काँग्रेसी शासनकर्ते स्वतःच्या वरिष्ठ नेत्याची फसवणूक करतात, ते जनतेशी कसे वागत असतील ?

पत्रकार दिलीप मंडल यांच्याकडून श्री सरस्वतीदेवीविषयी अश्‍लील ट्वीट

भारतात अशा कृत्यांसाठी कठोर कायदा नसल्याने धर्मद्रोह्यांचे फावते ! केंद्रातील भाजप सरकारने हिंदूंच्या देवतांचा विविध माध्यमांतून होणारा अवमान रोखण्यासाठी पाकमध्ये असलेल्या ईशनिंदा विरोधी कायद्याप्रमाणे कायदे करणे आवश्यक !

अंमलबजावणी संचालनालयाकडून ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया’ची १८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील कथित मानवाधिकार संघटना भारतविरोधी कारवाया करते. त्यामुळे या संघटनेची शाखा असलेल्या ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया’ची केवळ संपत्ती जप्त न करता त्याच्यावर बंदी घालणे आवश्यक !

हावडा (बंगाल) येथे श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करणार्‍या धर्मांधाला अटक

मशीद किंवा चर्च यांमध्ये तोडफोडीची घटना घडली असती, तर ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती आणि या घटनेतून हिंदूंना ‘तालिबानी’, ‘भगवे आतंकवादी’ ठरवण्यात आले असते; आता मात्र ‘सारे’ शांत आहेत !