सार्वजनिक विहिरींच्या देयकासाठी ३७ सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी गटविकास अधिकार्‍याला अटक !

लाचखोरीने पोखरलेला महाराष्ट्र ! लाचखोरी रोखण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद हवी !

लाचखोरीने पोखरलेला महाराष्ट्र !

बीड – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनतून खोदलेल्या सार्वजनिक विहिरींच्या खोदकामाचे देयक देण्यासाठी ३७ सहस्र रुपयांची लाच घेतांना गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १७ फेब्रुवारी या दिवशी कह्यात घेतले. नारायण मिसाळ यांच्याकडे बीड आणि पाटोदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदाचे दायित्व आहे.

पाटोदा तालुक्यातील कंत्राटदार तक्रारदाराने तालुक्यात १० ते १२ सार्वजनिक विहिरींची खोदकामे केली. या विहिरींच्या खोदकामाचे देयक देण्याची मागणी कंत्राटदाराने मिसाळ यांच्याकडे केली होती. हे देयक देण्यासाठी मिसाळ यांनी ५० सहस्र रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.