रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सामवेदी कार्तिक जोशी यांच्याकडून ‘सामगान’

सनातन संस्था ही एकमात्र अशी संस्था आहे, जिच्याविषयी माझ्या मनात श्रद्धा, प्रेम, आनंद आणि अभिमान आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे कार्य वैदिक, पुरोहित आणि ब्राह्मण यांच्यासह सनातन संस्थाही करत आहे, असे कौतुकोद्गार सामवेदी कार्तिक जोशी यांनी काढले.

उत्तर-मध्य मुंबईमध्ये भाजपची उमेदवारी उज्ज्वल निकम यांना !

उत्तर-मध्य मुंबईमधील भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. या मतदारसंघात भाजपकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाड यांना बिश्नोई टोळीच्या नावाने खंडणीसाठी धमकी

या गुन्ह्याचे अन्वेषण ठाणे सायबर सेलकडे सोपवण्यात आले आहे. याविषयी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी हेमंत वाणी यांनी तक्रार केली आहे.

आरोपी अनमोल बिश्नोई याच्या विरोधात ‘लुक आऊट’ नोटीस प्रसारित !

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या प्रकरणात सहभागी असलेल्या अनमोल याने हा गोळीबार सलमान खानसाठी पहिली आणि शेवटची चेतावणी असल्याचे सांगून ‘यापुढे भिंतींवर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत’, असे धमकावले होते.

आदित्य बिर्ला समुहाने बॉक्साईट हाताळणी महाराष्ट्रात हालवल्याने मुरगाव (गोवा) बंदराला मोठा फटका !

यापूर्वी आदित्य बिर्ला समुहाने ‘हिंडाल्को’ आस्थापनासाठी बॉक्साईट मुरगाव बंदरात आयात केले होते; मात्र याची वाहतूक शासकीय कारणामुळे १० दिवस बंदरात अडकून पडली होती. यामुळे आस्थापनाला १५ कोटी रुपयांची हानी सोसावी लागली होती !

संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ९ कोटी रुपयांचे कर्ज उचलणारे संचालक अभिषेक जैस्वाल यांना अटक !

संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अभिषेक जैस्वाल आणि मलकापूर को-ऑपरेटीव्ह बँकेत घोटाळा केल्याप्रकरणी त्यांचा भाऊ अंबरीश यांना आर्थिक गुन्हे शाखेने २५ एप्रिलच्या रात्री ११ वाजता अटक केली.

मराठा आरक्षण विरोधकांना पाडा !

प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना वरील विधान केले. ‘६ जूनपर्यंत मराठा आरक्षण न दिल्यास मी ८ जूनपासून पुन्हा ‘आमरण उपोषणा’ला बसणार आहे’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.

नागपूर येथे दीड वर्षांत १५२ आर्थिक घोटाळे उघड !

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी १ जानेवारी २०२० ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत प्रविष्ट झालेले गुन्हे, त्यात गुंतलेली रक्कम, किती गुन्ह्यांचा शोध लागला आदी माहिती मागितली होती.

मुसलमान उमेदवार नसल्याचे कारण देत नसीम खान यांचे काँग्रेसच्या मुख्य प्रचारकपदाचे त्यागपत्र !

दुखावलेल्या नसीम खान यांनी मुख्य प्रचारकपदाचे त्यागपत्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुग खर्गे यांना पाठवले आहे. नसीम खान ‘एम्.आय.एम्.आय.एम्.’कडून उमेदवारी लढवणार असल्याची चर्चा चालू आहे.

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक

संजय पानसरे यांनी मे. निर्मला औद्योगिक संस्थेचे मासिक भाडे ६१ सहस्र रुपये इतके असतांना ते ८ सहस्र रुपये इतके अल्प करण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.