पत्रकार दिलीप मंडल यांच्याकडून श्री सरस्वतीदेवीविषयी अश्‍लील ट्वीट

सामाजिक माध्यमांतून मंडल यांना अटक करण्याची मागणी

भारतात अशा कृत्यांसाठी कठोर कायदा नसल्याने धर्मद्रोह्यांचे फावले आहे. केंद्रातील भाजप सरकारने हिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारे विविध माध्यमांतून होणारा अवमान रोखण्यासाठी पाकमध्ये असलेल्या ईशनिंदा विरोधी कायद्याप्रमाणे कायदे करणे आवश्यक !

पत्रकार दिलीप मंडल

नवी देहली – वसंत पंचमीच्या दिवशी श्री सरस्वतीदेवीविषयी आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या प्रकरणी पत्रकार दिलीप मंडल यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.

यासाठी हॅशटॅगही करण्यात आला आहे. मंडल यांनी ट्वीट करतांना लिहिले होते, ‘मी सरस्वतीला विद्येची देवता मानत नाही. तिने कुठलीही शाळा उघडली नाही कि कोणतेही पुस्तक लिहिले नाही. हे दोन्ही कामे माता सावित्रीबाई फुले यांनी केले. तरीही मी सरस्वतीच्या समवेत आहे. ब्रह्माने तिचे लैंगिक शोषण केले.’ यासाठी मंडल यांनी महाराष्ट्र सरकारने प्रकाशित एका पुस्तकाचा उल्लेख केला.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)