सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुन्हा पुढे ढकलली : भाजपच्या १० आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिका प्रविष्ट केल्याचे प्रकरण

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केलेल्या १० बंडखोर आमदारांच्या विरोधात प्रविष्ट अपात्रता याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पुढे ढकलली आहे.

केरळमध्ये अल्पवयीन आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

अशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी पाया खणतांना सापडलेल्या पाण्याचा प्रवाह बांधकामामध्ये ठरत आहे अडथळा !

येथील श्रीरामजन्मभूमीवर उभारण्यात येणार्‍या श्रीराममंदिराच्या बांधकामामध्ये अडथळे येत आहेत. मंदिराचा पाया खणतांना तेथे शरयू नदीच्या पाण्याचा प्रवाह सापडला. यामुळे मंदिराच्या निर्मितीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते.

अफगाणिस्तानने चीनच्या अटक केलेल्या १० गुप्तहेरांना गुपचूप सोडले !

अफगाणिस्तान सरकारने चीनच्या अटक केलेल्या १० गुप्तहेरांना क्षमा करून त्यांची विशेष विमानाने चीनमध्ये रवानगी केली आहे. या हेरांमध्ये एका महिलेचाही समावेश होता.

अन्वेषण यंत्रणांना माहिती देणे, हे आमचे कर्तव्य ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

पीएमसी बँक आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

१५ जानेवारीपासून राज्यव्यापी शाळा बंद करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची चेतावणी 

देशातील इतर राज्यांमध्ये शिक्षणावर ९ ते १० टक्के व्यय केला जातो; मात्र महाराष्ट्रात तो ६ टक्के केला जातो.

कणकवली नगरपंचायत भाजीबाजाराच्या इमारतीच्या ठेकेदाराने फसवणूक केली ! – समीर नलावडे, नगराध्यक्ष

जे ठेकेदार नगरपंचायतीची फसवणूक करतात, ते सामान्य व्यक्तींशी कसा व्यवहार करत असतील ! अशा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक !

आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहस्रोंची उपस्थिती

नियम न पाळल्याविषयी जशी सामान्यांवर कारवाई होते, तशी कारवाई वरिष्ठ अधिकारीन वर केली जाणार का ?

सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या वाहन कर घोटाळ्यातील वाहने वापरणे अशक्य होणार

दलालाद्वारे कर भरूनही तो कार्यालयाकडे जमा न झाल्याने कर न भरलेल्या १०६ वाहनांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) रहित करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी केली.

हिंदु महासभेचे राष्ट्रीय महामंत्री देवेंद्र पांडे यांच्यावर प्राणघातक आक्रमण

आरोपींना त्वरित अटक करण्याची अखिल भारतीय हिंदु महासभेची मागणी – भाजपच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण होणे अपेक्षित नाही ! तेथील हिंदुत्वनिष्ठांना आश्‍वस्त करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !