केरळमध्ये अल्पवयीन आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

अशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमध्ये आदिवासी अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी १८ वर्षीय महंमद नौफल आणि १९ वर्षीय कानिंपत्त शमीम यांना अटक केली आहे. या दोघांनी या मुलींशी ओळख वाढवून त्यांच्याशी मैत्री केली होती. त्याचाच अपलाभ उठवत ख्रिस्ती नववर्षाच्या पूर्वसंध्येला त्यांना बाहेर फिरायला नेण्याच्या बहाण्याने त्यांचे लैंगिक शोषण केले. याविषयी मुलींनी त्यांच्या पालकांना सांगितल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर त्या दोघांना अटक करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी केरळमध्येच दोघा अल्पवयीन मुलींचे अनेकदा लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी नौशाद आणि नवास यांना अटक करण्यात आली होती.