अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी पाया खणतांना सापडलेल्या पाण्याचा प्रवाह बांधकामामध्ये ठरत आहे अडथळा !

प्रस्तावित राममंदिर

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर उभारण्यात येणार्‍या श्रीराममंदिराच्या बांधकामामध्ये अडथळे येत आहेत. मंदिराचा पाया खणतांना तेथे शरयू नदीच्या पाण्याचा प्रवाह सापडला. यामुळे मंदिराच्या निर्मितीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. याविषयावर मंदिर ट्रस्ट निर्माण समितीने आयआयटी अभियंत्यांकडे साहाय्य मागितले आहे. पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

श्रीराममंदिराचा पाया असलेल्या भूमीखाली वाळूमिश्रीत माती सापडली आहे. ही माती मंदिर निर्मितीसाठी योग्य नाही. हे भव्य मंदिर अनेक मोठ्या दगडांना आकार देऊन उभारले जाणार आहे. त्यामुळे या दगडांना पेलू शकेल, अशी माती मंदिराच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे, असे तज्ञांचे मत आहे.