मुंबई – अन्वेषण यंत्रणांना अन्वेषण करण्याचा अधिकार आहे. आम्ही कायद्याचे रक्षक आहोत. आम्ही कायद्याचा सन्मान करतो. सौ. वर्षा राऊत आणि आमचे अधिवक्ता यांनी यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाला माहिती दिली आहे. त्यांना अन्य काही माहिती हवी असल्यास तीही देण्यात येईल. अन्वेषण यंत्रणांना माहिती देणे, हे आमचे कर्तव्य आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकमधील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी ४ जानेवारी या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाकडून संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात आली. याविषयी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे संजय राऊत यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.