Geert Wilders On Pakistan : हिंदू आणि ख्रिस्ती यांच्या विरुद्ध आतंकवाद पसरवणारा देश म्हणजेच पाकिस्तान !

नेदरलँड्समधील इस्लामचे कट्टर विरोधक आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांचा आरोप

गीर्ट विल्डर्स

ॲमस्टरडॅम (नेदरलँड्स) – एक इस्लामी आतंकवादी देश जो हिंदू, ख्रिस्ती आणि इस्लामचे कथित विडंबन करणार्‍यांच्या विरुद्ध आतंकवाद पसरवतो. महंमद (पैगंबर) यांच्या नावाने फतवे काढतो.

एका भ्रष्टाचारी सरकारच्या माध्यमातून मला ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या मुल्लांना अटक करण्याचीही तसदी न घेणारा हा देश म्हणजेच पाकिस्तान, असे वक्तव्य नेदरलँड्स येथील इस्लामचे कट्टर विरोधक आणि ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार गीर्ट विल्डर्स यांनी ‘एक्स’वरून केले.