Persecution Of Minorities In Pakistan : पाकिस्तानमधील हिंदू आणि ख्रिस्ती यांची स्थिती भयावह !

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या अधिवेशनाच्या वेळी भारताचे विधान !

संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे प्रतिनिधी जावेद बेग

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५८ व्या अधिवेशनाच्या वेळी संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे प्रतिनिधी जावेद बेग यांनी पाकिस्तानमध्ये हिंदू आणि ख्रिस्ती यांच्यावरील छळाचे सूत्र उपस्थित केले आहे. ‘पाकिस्तानमधील हिंदू आणि ख्रिस्ती यांची स्थिती भयावह आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.

जगातील १५७ ख्रिस्तीबहुल देश यांचे मौन !

जावेद बेग यांनी सामाजिक माध्यमांतून पोस्ट करत म्हटले की, पाकिस्तानमधील हिंदु आणि ख्रिस्ती यांना हिंसाचार, छळ, बलपूर्वक धर्मांतर, अपहरण अन् अगदी हत्या  यांचा सामना करावा लागत आहे. दोन्ही समुदायांना अल्पसंख्यांक मानले जाते, जे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ३ टक्के आहेत. चर्च आणि मंदिरे यांसारख्या प्रार्थनास्थळांची नियमितपणे तोडफोड केली जाते. या धर्मातील तरुणींचे अपहरण केले जाते आणि त्यांचे मुसलमानांशी लग्न लावण्यास भाग पाडले जाते. आंतरराष्ट्रीय ख्रिस्ती  समुदायही यावर गप्प आहे. ब्राझिल, अमेरिका, रशिया यांसह १५७ ख्रिस्तीबहुल देशांपैकी कोणत्याही देशाने पाकिस्तानमधील ख्रिस्ती अल्पसंख्यांकांवर होणार्‍या छळाबद्दल सार्वजनिकपणे प्रश्‍न उपस्थित केलेला नाही. (जसे ख्रिस्ती देश पाकमधील ख्रिस्त्यांविषयी गप्प आहेत, तसेच हिंदूबहुल भारत बांगलादेश, पाकिस्तान आदी देशांतील हिंदूंवरील अत्याचारांवर मौन बागळतो, हेही तितकेच सत्य आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करणे, हाच संपूर्ण जगासाठी शांततेचा प्रयत्न ठरेल ! यासाठी भारताने पुढाकार घेणे आवश्यक आहे; कारण तो पाकचा शेजारी आणि पाकपुरस्कृत आतंकवादाने सर्वाधिक पीडित देश आहे !
  • केवळ हिंदु आणि ख्रिस्तीच नाही, तर अहमदिया मुसलमान, बलुची मुसलमान आणि अफगाणी मुसलमान यांचीही स्थिती भयावह आहे. जेथे मुसलमान सर्वाधिक असतात, तेथे ते अन्य धर्मियांचा वंशसंहार करण्यासह एकमेकांनाही ठार मारतात !