Baba Vanga Predictions : पूर्व आणि पश्चिम देशांमध्ये तिसरे महायुद्ध होईल !

महिला भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनी करून ठेवलेले भाकीत !

भविष्यवेत्त्या बाबा वेंगा

नवी देहली – युरोपमधील बल्गेरिया देशात होऊन गेलेल्या बाबा वेंगा या भविष्यवेत्त्या महिलेने करून ठेवलेली भाकिते समोर येत आहेत. त्यांच्या भविष्यवाणीनुसार वर्ष २०२५ मध्ये सीरिया या देशाचे पतन चालू होताच जगात तिसर्‍या महायुद्धाला प्रारंभ होईल. पूर्व आणि पश्चिम देशांमध्ये तिसरे महायुद्ध होईल. हे युद्ध प्रामुख्याने युरोपमध्ये चालू होईल. त्यामुळे युरोपमधील लोकसंख्या झपाट्याने घटेल.

जर्मनीच्या एका शहरात इस्लामी राजवट येणार !

बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार युरोपमधील जर्मनी देशाच्या एका शहरात इराणची मुसलमान राजवट प्रस्थापित होईल. सध्याची परिस्थिती पाहिली, तर सध्या जर्मनीत सुमारे ५ टक्के मुसलमान लोकसंख्या आहे आणि ती झपाट्याने वाढत आहे. जेव्हा संपूर्ण जर्मनीमध्ये मुसलमान राजवट येईल, तेव्हा अमेरिकेलाही अडचणींचा सामना करावा लागेल, ज्यामुळे जगातील परिस्थिती आणखी बिघडू शकते.

मानवाचा दुसर्‍या ग्रहावरील समूहाशी पहिला संवाद होणार

वर्ष २०२५ मध्ये मानवाचा ब्रह्मांडातील दुसर्‍या ग्रहावरील समूहाशी पहिला संवाद घडेल, असेही बाबा वेंगा भाकीत करून ठेवले आहे.