
पॅरिस – फ्रान्स आणखी एक अणूयुद्ध करण्यास सक्षम असलेला वायूदलाचा तळ बांधत आहेत. एवढेच नाही, तर या तळावर ४० नवीन राफेल लढाऊ विमाने तैनात केली जातील. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नुकतीच या नवीन आण्विक तळाच्या बांधकामाची घोषणा केली. लक्सेलमध्ये हा नवीन वायूदल तळ बांधला जात आहे. फ्रान्सने ही घोषणा अशा वेळी केली आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प ‘नाटो’ देशांतून बाहेर पडत आहेत आणि युरोपीय देश रशियाच्या आण्विक आक्रमणाच्या भीतीने जगत आहेत.
१. आता युरोपीय देशांनी अमेरिकेविना त्यांची आण्विक प्रतिबंधक क्षमता भक्कम करण्याचा निर्णय घेतला आहे.

२. फ्रान्सने अणूयुद्ध करण्यास सक्षम वायूदलाचा तळ बांधण्याचा घेतलेला निर्णय फ्रेंच वायूदलासाठी खूप महत्त्वाचा आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. सध्या फ्रान्समधील सेंट डिझियर, इस्ट्रेस आणि अव्होर्ड या ३ तळांवर अणूबाँब ठेवले आहेत. या तळांवर ५० राफेल विमानेही तैनात आहेत.
३. डॉनल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी ज्या दिवशी चर्चा केली त्याच दिवशी फ्रान्सने ही घोषणा केली. या घोषणेद्वारे फ्रान्सने ट्रम्प आणि पुतिन दोघांनाही संदेश दिला आहे. त्यांनी हेदेखील दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की, त्यांना अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमतेसाठी अमेरिकेची आवश्यकता नाही. फ्रान्सकडे सध्या सुमारे २९० अणूबाँब आहेत.