World Sindhi Congress Protest : जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ठिकाणी सिंधी नागरिकांकडून पाकविरोधात निदर्शने

सिंधू नदीवर बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या कालव्यांना केला विरोध

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५८ व्या अधिवेशनात जागतिक सिंधी काँग्रेसने पाकिस्तानविरुद्ध संताप व्यक्त केला. पाकिस्तानातील सिंधमध्ये चालू असलेल्या मानवतावादी संकटाकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. सिंधू नदीच्या काठावर पाकिस्तानने बांधलेल्या बेकायदेशीर कालव्यांविरुद्ध आवाज उठवणे हा त्याचा उद्देश होता.

निदर्शनात सहभागी असलेल्या सिंधी कार्यकर्त्यांनी ‘सिंधू नदीवर कालवा नको, सिंधींचे जीवनही महत्त्वाचे आहे’ आणि ‘सिंधू नदीवरील बेकायदेशीर कालवे थांबवा’, असे लिहिलेले फलक हातात घेतले होते. याद्वारे त्यांनी पाकिस्तानच्या मनमानी आणि बेकायदेशीर कालव्यांच्या बांधकामावर नाराजी व्यक्त केली.