कोरोनाकाळात नागरिकांना साहाय्य करणार्‍या पोलिसांचा युवासेनेच्या वतीने सन्मान

कोरोनाकाळात नागरिकांना साहाय्य करणार्‍या  पोलिसांचा युवासेनेच्या वतीने मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शाल आणि पुस्तके देऊन सन्मान.

सौ. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याठी मुदतवाढ ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस दिल्यामुळे अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत; मात्र मी शिवसेनेमध्ये आहे, शिवसेनेतच राहीन आणि शिवसेनेतच मरीन.

मराठा आणि मागासवर्गीय समाजात तेढ निर्माण करणारे भुजबळ आणि वडेट्टीवार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा !

छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्यामुळे मराठा आणि इतर मागासवर्गीय या दोन समाजात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे दोन्ही नेते भडकावू वक्तव्ये करत आहेत.

काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली पोलिसांना दिसली नाही का ? – रविकिरण इंगवले, शहरप्रमुख, शिवसेना

पदवीधर निवडणुकीत झालेले मेळावे, तसेच रॅलीमध्ये ट्रॅक्टरवर दिमाखात बसलेली नेतेमंडळी पोलीस प्रशासनाला दिसली नाही. शिवाजी पेठेत फिरंगाई प्रभागात झालेला मेळावा मात्र पोलिसांना दिसला आणि त्यांनी माझ्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला.

पोलीस प्रशासनाने कसायांचा कायमचा बंदोबस्त करून गोहत्या थांबवावी ! – मिलिंद एकबोटे, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ

कसायांकडून दिवसाढवळ्या पोलिसांसमक्ष गोरक्षकांवर आक्रमण झाले याचा अर्थ कसायांना कायद्याचा धाक आणि पोलिसांची भीती राहिलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कसायांचा कायमचा बंदोबस्त करून गोहत्या थांबवावी.  

कॉलसेंटरमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली शेकडो युवकांची फसवणूक

कॉलसेंटरमध्ये नोकरी आहे, अशी जाहिरात देऊन शेकडो युवकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे कैलास भारत कसबे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लातूर येथे बनला पहिला रेल्वे कोच

मराठवाड्यातील लातूर शहरातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये पहिला रेल्वे कोच शेल सिद्ध करण्यात आला आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर हा पहिला कोच शेल पूर्णत्वाने साकार करण्यात आला.

भीमा नदीपात्रात सापडली भगवान शंकराची पुरातन मूर्ती

भीमा नदीपात्रातील २८ मोर्‍यांच्या रेल्वे पुलाजवळ भगवान शंकराचे मुख असलेली अनुमाने १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकाम करतांना सापडली आहे. या मूर्तीचा तोंडवळा ५ फूट असून तिचे वजन १ टनापर्यंत आहे.

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे ! – भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचा आरोप

एका मंदिरावर धर्मांध नियंत्रण मिळवतात आणि हिंदू गप्प बसतात, हे संतापजनक ! अनेक शतके धर्मांध हिंदूंवर अत्याचार करत असूनसुद्धा हिंदूंच्या वृत्तीत पालट न झाल्याने म्हणजे साधनेचे आध्यात्मिक बळ न वाढवल्याने त्यांची झालेली ही दुःस्थिती !

अकोले (जिल्हा नगर) येथील आदिवासींच्या धर्मांतराचा प्रयत्न आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उधळला !

आदिवासींचे धर्मांतर रोखणार्‍या आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या धूर्त ख्रिस्त्यांवर कारवाई होईपर्यंत हिंदूंनी सरकारचा पाठपुरावा करावा ! सरकारनेही राष्ट्रीय पातळीवर कठोर कायदा केला पाहिजे !