Taslima Nasrin On Bangladesh : बांगलादेशातील अराजकतेच्‍या मागे कट्टरतावादी इस्‍लामी गटाचा हात ! – तस्‍लिमा नसरीन

तस्‍लिमा नसरीन

नवी देहली – बांगलादेशाच्‍या सुप्रसिद्ध लेखिका तस्‍लिमा नसरीन यांनी बांगलादेशातील स्‍थिती, आतंकवाद, महिलांची अवस्‍था यांवर भाष्‍य केले आहे. ‘आतंकवाद हा एका दिवसात जन्‍माला येत नाही. आधी धर्मांधता जन्‍माला येते’, असे त्‍यांनी म्‍हटले आहे. बांगलादेशात विद्यार्थ्‍यांना भडकावणारे लोक वेगळे आहेत.

या सगळ्‍यामागे कट्टरतावादी इस्‍लामी गटाचा हात आहे, असे तस्‍लिमा नसरीन म्‍हणाल्‍या. एका वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत तस्‍लिमा नसरीन यांनी हे वक्‍तव्‍य केले आहे.

तस्‍लिमा नसरीन पुढे म्‍हणाल्‍या …

१. ८०च्‍या दशकापर्यंत मशिदीत केवळ वृद्ध माणसे जायची. आता लहान मुले, तरुण सगळेच जात आहेत. रस्‍ता बंद करून नमाजपठण केले जाते. आतंकवाद एका दिवसात जन्‍माला येत नाही. आधी धर्मांधता जन्‍मते, त्‍यानंतर कट्टरतावाद जन्‍माला येतो आणि मग आतंकवाद जन्‍म घेतो. त्‍यासाठी दीर्घकाळ इस्‍लामी पद्धतीने बुद्धीभेद केला जातो.

बांगलादेशात धर्मांधता कट्टरतावाद्यांना प्रोत्‍साहन

२. ‘आपल्‍याला मदरशांची आवश्‍यकता नाही’, हे मी मागील ४० वर्षांपासून सांगते आहे. धर्म घरात शिकवा आणि शिक्षण शाळेत. मशिदी बांधण्‍यापेक्षा चांगल्‍या शाळा, प्रयोगशाळा उभारा. मुलांना विज्ञानापासून सगळे विषय शिकवा. जेवढी सरकारे आली त्‍यांनी धर्मांधता वाढवली आहे, तसेच कट्टरतावाद्यांना प्रोत्‍साहन दिले आहे.