मुंबई – वाढत्या गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेतून प्रवास करणे अशक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता लोकलगाड्यांमध्ये केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासंबंधी कार्यादेश काढण्यात आला आहे. २७ फेब्रुवारी या दिवशी या प्रस्तावाला समंती दिली होती; मात्र रेल्वे प्रशासनाकडून कार्यादेशासाठी विलंब झाला आहे. पुढील २ वर्षांत पश्चिम रेल्वेतील १०५ डब्यांचे आणि मध्य रेल्वेच्या १५५ डब्यांचे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डब्यात रूपांतर होईल.