भोर (जिल्हा पुणे) – शहरापासून जवळ असलेल्या भोलावडे गावाने धार्मिक परंपरेचा वारसा जपत अनंतचतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत वारकरी संप्रदायाचा वारसा जपत, टाळमृदुंगाच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढली. या मिरवणुकीत लहान मुले, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची जागृती करत तरुणांनी सहभाग घेतला. वारकरी संप्रदायाचा पोशाख घालून वारकर्यांचे महत्त्वही या वेळी उपस्थितांना सांगण्यात आले.
‘हिंदु धर्माचे रक्षण कसे करावे ?’, ‘मुली आणि महिला यांनी कपाळावर कुंकू लावून हिंदु (मराठी) संस्कृतीची जपणूक करायला हवी’, ‘मुली आणि महिला यांवर होणारे अत्याचार रोखणे’, या आणि अशा आशयाचे अन्य फलक हातात धरून मिरवणुकीत जनजागृतीपर संदेश देण्याचा प्रयत्न गावातील तरुणांनी केला.