बारव्हा (जिल्हा भंडारा) येथे विसर्जन मिरवणूक पहातांना छत कोसळल्याने ४० महिला घायाळ !

घटनास्थळीचे छायाचित्र

भंडारा – जिल्ह्यातील बारव्हा या गावात सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक पहाण्यासाठी मोठ्या संख्येने लोक छतावर उभे असतांना अचानक एक छत कोसळले. या अपघातात ३०-४० महिला घायाळ झाल्या असून त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी पाठवण्यात आले. १७ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली.

श्री गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक पहाण्यासाठी एका जीर्ण छतावर महिला मोठ्या प्रमाणात जमल्या होत्या. अंकुश बोकडे आणि शेषराव शिंदे यांच्या मालकीच्या इमारतीवर ही मोठी गर्दी झाली होती. इमारत जीर्ण असल्याने भार सहन न झाल्याने अचानक हे छत कोसळले.