नागमंगल (कर्नाटक) – नागमंगलमध्ये हिंदु आणि मुसलमान यांच्यासाठी वेगवेगळा न्याय आहे. कर्नाटकात लोकशाही कुठे आहे ? असा प्रश्न आमदार रविकुमार यांनी उपस्थित केला.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना रविकुमार म्हणाले की,
१. एकीकडे भाजपचे आमदार मुनिरत्न यांच्यावर अत्याचाराचा खटला चालू असून त्यांना अटक केली आहे; मात्र दुसरीकडे महिनाभरापूर्वी काँग्रेसचे आमदार चन्नारेड्डी यांच्यावरदेखील अत्याचाराचा खटला प्रविष्ट (दाखल) करण्यात आला होता; परंतु त्यांना अजून अटक झालेली नाही. हीच का तुमची लोकशाही ? हेच का तुमचे सेक्युलरिझम ? हेच का तुमचे संविधान ?, असे प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विचारले आहेत.
२. नागमंगलमध्ये श्री गणपती उत्सव साजरा करणार्या आणि मिरवणुकीत सहभागी झालेल्या हिंदु तरुणांवर दगडफेक करण्यात आली आणि श्री गणेशमूर्तीवर चपला फेकण्यात आल्या. हिंदूंवर लाठीमार आणि दगडफेक करण्यात आली. अनेक हिंदूंची दुकाने जाळली गेली; मात्र, हिंदूंनाच प्रमुख आरोपी बनवून त्यांच्यावर खटले भरण्यात आले.
३. दंगलीत दुकाने जाळणार्यांना, तसेच चपला आणि दगड फेकणार्यांना या खटल्यातून वगळण्यात आले आहे. हीच का राज्याची लोकशाही ?, असा प्रश्न रविकुमार उपस्थित केला आहे. हिंदूंना एक न्याय, तर मुसलमानांना दुसरा न्याय, अशी चित्र निर्माण झाले आहे, असेही ते म्हणाले.