दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दोंडाईचा (धुळे) येथे धर्मांधांकडून छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना; नंदुरबार येथे ईदच्या मिरवणुकीत धर्मांधांची दंगल !

दोंडाईचा (धुळे) येथे धर्मांधांकडून छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना

दोंडाईचा (धुळे) – येथे ईदची मिरवणूक चालू असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर धर्मांधांनी पेटते फटाके फेकले. यामुळे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले. या वेळी धर्मांधांनी अनेक हिंदूंच्या गाड्या फोडल्या. एका लहान मुलीला धर्मांधांकडून झालेल्या दगडफेकीत दुखापत झाली.

संपादकीय भूमिका : कारवाई न करणार्‍या पोलिसांकडूनच आता हिंदूंची हानीभरपाई करून घ्या !


नंदुरबार येथे ईदच्या मिरवणुकीत धर्मांधांची दंगल !

नंदुरबार – शहरात ईदच्या मिरवणुकीत धर्मांधांनी दगडफेक केली आणि हैदोस घालत माळीवाडा परिसरात हिंदूंची दुकाने, तसेच गाड्या यांची तोडफोड केली.

संपादकीय भूमिका : धर्मांधांना कायद्याचा धाक वाटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !


माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणूक लढवणार ?

मुंबई –  माजी पोलीस आयुक्त संजय पांडे वर्सोव्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील, असे समजते. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांना नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या कर्मचार्‍यांशी संबंधित फोन टॅपिंग प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर पांडेंना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. त्यांनी स्वतःच दीड महिन्यापूर्वी स्वतःची उमेदवारी घोषित केली होती. वर्सोवा भागातील झुलेलाल मंदिरात निवडणुकीचा ‘नारळ’ वाढवला होता.


‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे आयोजन !

मुंबई – राज्य सरकारने आता महिलांसाठी इतर योजना आणि उपक्रमांची प्रभावी कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात लोकप्रिय असलेले ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन आता राज्याच्या सर्व विभागांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग यांच्या वतीने विविध वस्तूंचे आणि खाद्यपदार्थांचे हे प्रदर्शन असते.


लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आग

मुंबई – अंधेरी पश्चिम भागातील उच्चभ्रू लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये १९ सप्टेंबरला सकाळी भीषण आग लागली. कॉम्प्लेक्समधील एक मजली बंगल्यात ही आग भडकली. अग्नीशमनदलाचे कर्मचारी घटनास्थळी येऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.