|
आळंदी – नगर परिषदेच्या आवाहनास प्रतिसाद देत अनुमाने ७ सहस्र श्री गणेशमूर्तींचे नदीकाठीच नगर परिषदेच्या वतीने उभारलेल्या मूर्तीसंकलन केंद्रात संकलन करण्यात आले. (दान केलेल्या मूर्ती खाणीत टाकल्या जातात. रस्ता बुजवण्यासाठी मूर्तीचा वापर केला जातो. नाल्यामध्ये मूर्तींचे विसर्जन केले जाते, असे लक्षात आले आहे. त्यामुळे श्री गणेशमूर्ती देऊन भाविकांनी श्री गणेशाची कोणती कृपा संपादन केली आहे ? याचा त्यांनी विचार करायला हवा ! – संपादक)
गेल्या १२ वर्षांपासून आळंदी नगर परिषद मूर्तीसंकलन करत आहे. नदीप्रदूषण टाळण्यासाठी इंद्रायणी नदीवरील दगडी घाट विसर्जन काळात बंद केला होता. इंद्रायणीकडे जाण्यास मज्जाव होता. त्याऐवजी शहरात ६ ठिकाणी मूर्तीसंकलन केंद्रे उभी केली. पाण्याच्या कृत्रिम हौदात मूर्तीसंकलन केले जात होते. मूर्तीची आरती करून हौदामध्ये विसर्जन करून मूर्तीदान केले जात होते. यासाठी नगर परिषदेला ५ लाखांचा व्यय करावा लागला.
संपादकीय भूमिकानदीचे घाट बंद करून वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जनास बंदी करणारे धर्मद्रोहच करत आहेत, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ? ईदच्या दिवशी प्राण्यांना कापून ते रक्त नद्या, नाले किंवा इतरत्र सोडले जाते त्या वेळी नदी प्रदूषित होत नाही का ? पाण्यात मूर्ती विसर्जित केल्याने पाण्याचे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, हे अनेक वेळा प्रयोगातून सिद्ध करण्यात आले आहे, असा अहवाल महाराष्ट्र, तसेच गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानेही दिला आहे. असे असतांना ‘केवळ गणेशमूर्ती विसर्जित केल्याने प्रदूषण होते’, हा ढोंगीपणाने अपप्रचार का केला जातो ? |