जीएसटी तरतुदींविरोधात निषेध आंदोलन ! – ‘ऑल इंडिया प्रोटेस्ट कमिटी’चे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र सोनावणे

जीएसटीतील तरतुदींविरोधात २९ जानेवारी या दिवशी देशभरात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यात जीएसटी कार्यालयासमोर सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात येईल, – ‘ऑल इंडिया प्रोटेस्ट कमिटी’चे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र सोनावणे

रायगड येथून अमली पदार्थ विक्रेत्यास अटक

अमली पदार्थ विक्रेता आरिफ भुजवाला याला अमली पदार्थ नियंत्रक विभागाने रायगडमधून अटक केली आहे. आरिफ हा दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीश इब्राहिमचा जवळचा साथीदार असल्याचे सांगितले जात आहे.

जुन्नर (पुणे) येथील देशी कुक्कुटपालन फार्ममधील २०० कोंबड्या अज्ञात आजाराने मृत

सध्या राज्यात बर्ड फ्लूच्या संसर्गाची स्थिती असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग निदान प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

९०० कोटी रुपयांचा सायबर गुन्हे सुरक्षा प्रकल्प लवकर चालू करणार – गृहमंत्री

राज्यात ९०० कोटी रुपयांचा सायबर गुन्हे सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प लवकर चालू करून या माध्यमातून सायबर गुन्हे थांबवण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

स्वयंपूर्ण आणि भांगराळे (सोनेरी) गोवा यांसाठी सरकार कटीबद्ध ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

विकास आणि जागतिकीकरण यांच्या दृष्टीने गोवा संपूर्ण देशासमवेत हातात हात घालून पुढे जात आहे आणि तो आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात काढले.

नेपाळचे कम्युनिस्ट पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी पहिल्यांदाच पशुपतिनाथ मंदिरात जाऊन केली पूजा !

नेपाळची सत्ता हातातून निसटू पहात असल्याने आता कम्युनिस्टांनाही देव आठवू लागला आहे ! ओली यांच्या या दिखाऊपणाला नेपाळी हिंदूंनी न भुलता राजेशाही आणि हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे !

नोएडा (उत्तरप्रदेश) हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी विवाह केल्याने तरुणीच्या भावाकडून तरुणाची हत्या

हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत त्यांच्याशी विवाह करणार्‍यांच्या विरोधात पोलीसही काही करत नाहीत. हिंदु तरुणाने प्रेम करून मुसलमान तरुणीशी विवाह केला, तर त्याला ठार केले जाते, हे लक्षात घ्या !

गोव्यातील लोकसंस्कृतीचे संशोधक विनायक खेडेकर यांना पद्मश्री पुरस्कार

गोव्यातील लोकसंस्कृतीचे संशोधक आणि साहित्यिक श्री. विनायक विष्णु खेडेकर यांना प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

८ वर्षे जुनी गाडी असलेल्यांना आता ‘हरित कर’ भरावा लागणार !

८ वर्षे जुन्या वाहनांवर लवकरच हरित कर (‘ग्रीन टॅक्स’) आकारला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘ग्रीन टॅक्स’ आकारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा ! – हिंदु जनजागृती समिती

तिरंगा मास्क किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज हे देशप्रमाचे प्रदर्शन करण्याचे माध्यम नाही. उलट ध्वजसंहितेनुसार अशा प्रकारे राष्ट्रध्वजाचा वापर करणे, हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे आणि हे राष्ट्रगौरव अपमान निवारण अधिनियम १९७१ चे उल्लंघन आहे.