नेपाळचे कम्युनिस्ट पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी पहिल्यांदाच पशुपतिनाथ मंदिरात जाऊन केली पूजा !

  • नेपाळची सत्ता हातातून निसटू पहात असल्याने आता कम्युनिस्टांनाही देव आठवू लागला आहे, हे लक्षात घ्या !
  • ओली यांच्या या दिखाऊपणाला नेपाळी हिंदूंनी न भुलता राजेशाही आणि हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळ कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी प्रथमच पशुपतिनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजा केली. येथे त्यांनी सवा लाख दिवेही लावले. जवळपास सवा घंटे ते या मंदिरात होते. यानंतर त्यांनी पशुपतिनाथ मंदिराला ‘सनातन धर्मियांचे पवित्र स्थान’ या रूपात याला विकसित करण्याचा आदेश दिला. ओली हे नेपाळचे पहिले कम्युनिस्ट पंतप्रधान आहेत, ज्यांनी या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. माजी पंतप्रधान आणि कम्युनिस्ट नेते पुष्प कमल दहल प्रचंड, माधवकुमार नेपाल, बाबूराम भट्टाराई आणि झालानाथ खनल हे कधीही पशुपतिनाथ मंदिरात गेले नव्हते. तसेच त्यांनी कधीही ईश्‍वराच्या नावाने शपथ घेतली नव्हती.

याविषयी येथील राजकीय तज्ञ श्याम श्रेष्ठ यांनी सांगितले, ‘ओली धर्मनिरपेक्षता सोडण्याच्या विचारात आहेत. ते राजेशाहीचे समर्थक आणि हिंदु राष्ट्राचे समर्थक यांची मते मिळवण्यासाठी असा प्रयत्न करत आहेत’, असे वाटते.’