जुन्नर (पुणे) येथील देशी कुक्कुटपालन फार्ममधील २०० कोंबड्या अज्ञात आजाराने मृत

प्रतिकात्मक चित्र

जुन्नर (पुणे) – तालुक्यातील येडगाव येथील परिसरात देशी कुक्कुटपालन फार्ममधील २०० कोंबड्या अज्ञात आजाराने मृत झाल्या आहेत. सध्या राज्यात बर्ड फ्लूच्या संसर्गाची स्थिती असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग निदान प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती जुन्नर पंचायत समितीचे पशूधन विकास अधिकारी डॉ. एम्.एस्. शेजाळ यांनी दिली आहे. मृत कोंबड्यांचा रोग निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत येडगाव शिवारातील १० किमीपर्यंतचा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिनव देशमुख यांनी काढला आहे, अशी माहिती तहसीलदार हनुमंत केळकर यांनी दिली.