जीएसटी तरतुदींविरोधात निषेध आंदोलन ! – ‘ऑल इंडिया प्रोटेस्ट कमिटी’चे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र सोनावणे

पुणे – गेल्या ३ ते ५ वर्षांत जीएसटीतील तरतुदी अधिक जाचक झाल्या आहेत. त्यामुळे वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) अटी, तरतुदी आणि किचकट संगणकीय प्रणालीला देशभरातील कर सल्लागार, व्यापारी, सनदी लेखापाल यांच्याकडून विरोध करण्यात येत आहे. जीएसटीतील तरतुदींविरोधात २९ जानेवारी या दिवशी देशभरात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यात जीएसटी कार्यालयासमोर सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती २५ जानेवारी या दिवशी ‘ऑल इंडिया प्रोटेस्ट कमिटी’चे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र सोनावणे यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष विलास आहेरकर, राष्ट्रीय समन्वयक स्वप्नील मुनोत आदी या वेळी उपस्थित होते. ‘कर चुकवणार्‍यांवर कर विभागाला कारवाई करता येत नसल्याने किचकट पूर्ततांचे ओझे करदात्यांवर लादण्यात आले आहे. त्यात प्रामाणिक व्यापारी भरडले जात आहेत. त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे’, असे सोनावणे यांनी सांगितले.