नागपूर येथे ‘बर्ड फ्ल्यू’मुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू !

आजारी कोंबड्यांचे नमुने पुणे आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर ४ मार्च या दिवशी आलेल्या अहवालात कोंबड्यांना ‘बर्ड फ्ल्यू’ची म्हणजेच ‘एवियन इन्फ्लूएंझा’ची लागण झाल्याचे सिद्ध झाले.

जुन्नर (पुणे) येथील देशी कुक्कुटपालन फार्ममधील २०० कोंबड्या अज्ञात आजाराने मृत

सध्या राज्यात बर्ड फ्लूच्या संसर्गाची स्थिती असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग निदान प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

राज्यातील बर्ड फ्ल्यू हानीग्रस्तांना भरपाई देणार – सुनील केदार, पशूसंवर्धन मंत्री

बाधित क्षेत्राच्या १ कि.मी. परिघातील कुक्कुट पालकांना, जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुक्कुट आणि इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची हानीभरपाई दिली जाणार आहे.

नागपूर जिल्ह्यात पशूसंवर्धन विभागाने ४६० कोंबड्यांना ठार केले !

नागपूरसह राज्यातील ८ जिल्ह्यांत ‘बर्ड फ्ल्यू’च्या साथीने थैमान घातले आहे. भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशू रोग संस्थानच्या अहवालातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.

राज्यात पाच दिवसांत १ सहस्र ८३९ पक्ष्यांचा मृत्यू

राज्यात गेल्या पाच दिवसांपासून १ सहस्र ८३९ पक्ष्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याचे पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. मुंबई, दापोली, परभणी, लातूर येथील पक्ष्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव दिसून आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘बर्ड फ्लू’च्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेचे आवाहन

बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने मुंबईत पक्ष्यांचे मृत्यू झाल्यास पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या १९१६ या साहाय्य क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

परदेशातील पक्ष्यांमुळे परभणी येथे ‘बर्ड फ्ल्यू’चा शिरकाव ! – प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय 

मुरुंबा गावापासून दोन ते अडीच किमी अंतरावर असलेल्या रहाटी बंधार्‍यावर येणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांनी ‘बर्ड फ्ल्यू’ येथे आणल्याचा अंदाज परभणी येथील पशूविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांनी व्यक्त केला आहे.

‘बर्ड फ्ल्यू’मुळे मुरुंबा (जिल्हा परभणी) गावात संचारबंदी लागू

मुरुंबा गावात ‘बर्ड फ्ल्यू’मुळे अनुमाने ८०० कोंबड्यांच्या मृत्यू झाला. गेल्या २ दिवसांत पुन्हा याच परिसरातील अन्य कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. हा आजार पसरू नये; म्हणून जिल्हा प्रशासनाने या गावात संचारबंदी लागू केली आहे.

मुरुंबा (जिल्हा परभणी) येथे ८०० हून अधिक कोंबड्या मृत्युमुखी !

‘बर्ड फ्लू’च्या आजाराचे संकट घोंगावत असतांनाच घडलेली ही घटना चिंताजनक आहे ! 

महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही ! – पशूसंवर्धनमंत्री सुनील केदार

राज्यातील विविध जिल्ह्यांत पक्ष्यांची पडताळणी केली असून राज्यात बर्ड फ्लू अस्तित्वात नाही, असे विधान पशूसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केले आहे. ठाणे येथे १६ पक्षी मृतावस्थेत सापडल्याने बर्ड फ्लूची शंका निर्माण झाली होती; मात्र त्या पक्ष्यांची बर्ड फ्लूची केलेली पडताळणी नकारात्मक आली.