पाळी (गोवा) येथील श्री नवदुर्गा देवस्थानचा आज गवळण काला

देऊळवाडा, पाळी येथील श्री नवदुर्गा देवस्थानच्या कालोत्सवाला २६ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला. २७ जानेवारी २०२१ या दिवशी दुपारी ३.३० वाजता च्यारी बंधू दऊळवाडा यांच्या वतीने गवळण काला होणार आहे.

आता डोळ्यांना न दिसणार्‍या शत्रूसमवेत आपले युद्ध चालू झाले आहे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपल्याच साधनांचा वापर करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत आहे. जगात कुठेही बसून घरातील माहिती, पैसे आणि अन्य गोष्टींची चोरी या माध्यमातून चालू आहे. असे असले, तरी गुन्हेगारी विश्वात धाक बसवणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल !

‘जय श्रीराम’ म्हटल्याने कुणाचीही धर्मनिरपेक्षता धोक्यात येत नाही ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

‘‘जय श्रीराम’ ऐकायला आणि म्हणायला या देशात कुणालाही त्रास व्हायला नको. प्रभु श्रीराम हे या देशाची अस्मिता आणि आधार आहेत. ‘जय श्रीराम’ हा काही राजकीय शब्द नाही. हा आमचा श्रद्धेचा विषय आहे.

भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात जामनेर (जिल्हा जळगाव) येथे गुन्हा नोंद

भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीत लभान गोरबंजारा समाजातील महिलांविषयी अपमानास्पद लिखाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांना ‘सावरकर रत्न’ पुरस्कार प्रदान !

मराठी भाषा विश्व, पुणे या संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. ए.बी. पाटील यांच्या हस्ते हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांना ‘सावरकर रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संकटावर मात करून विकासाकडे वाटचाल ! – पालकमंत्री संजय राठोड, यवतमाळ जिल्हा

अविरत प्रयत्न आणि हुतात्म्यांच्या बलीदानातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित बांधव यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदु मानून सरकार काम करीत आहे.

कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस १ फेब्रुवारीपासून चालू ! – संजीव मित्तल

आम्ही कोरोनाकाळात श्रमिकांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध केली. त्यानंतर विशेष रेल्वे गाड्याही चालू केल्या आहेत. दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे गाड्या हळूहळू चालू करत आहोत. कोल्हापूर- वैभववाडी मार्गाचे काम येत्या वर्षभरात चालू करण्याचा प्रयत्न आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात वीजदेयक प्रकरणी फसवणूक केल्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तक्रार

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे २६ जानेवारी या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

कोळसा खाणींमुळे वणी ताक्यातील शेती व्यवसायाची पुष्कळ हानी

परिसरातील कोळसा खाणींमुळे प्रदूषणात झालेली वाढ, कृत्रिम टेकड्या आणि जंगले यांमुळे शेती व्यवसायाची पुष्कळ हानी झाली आहे. अकार्यक्षम प्रदूषण नियंत्रण मंडळामुळे खाण प्रशासन उद्दाम झाले आहे. प्रदूषणामुळे उत्पन्न अल्प झाले आहे.

नगरसेवक युवराज बावडेकर यांचे गटनेता आणि सभागृह नेते पदाचे त्यागपत्र

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे विद्यमान सभागृह आणि गटनेते युवराज बावडेकर यांनी पक्षाचा आदेश प्राप्त झाल्याने दोन्हींचे त्यागपत्र दिले. हे त्यागपत्र बावडेकर यांनी महापालिका जिल्हाध्यक्ष अध्यक्ष दीपक शिंदे यांच्याकडे सोपवले.