जालना येथे दळणवळण बंदी नाही; पण कठोर निर्बंध लागू !

यामध्ये ३१ मार्चपर्यंत इयत्ता १० वी आणि १२ वीच्या शाळा वगळता इतर शाळा, वसतीगृहे, शिकवणीवर्ग, यात्रा, आठवडी बाजार, मोर्चे, आंदोलने हे सर्व बंद रहाणार आहे. शाळा, शिकवणी वर्ग आणि महाविद्यालये जरी बंद असली, तरी शिक्षकांना मात्र शाळेत जाऊन आपले कर्तव्य पार पाडावे लागणार आहे.

अकोला येथे संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासह पेट्रोल पंपांवर गर्दी

जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद असली, तरीही काही जणांनी ही दुकाने चालू केली आहेत. त्यामुळे अशा दुकानांवर महापालिका प्रशासन, पोलीस आणि महसूल विभागातील कर्मचारी एकत्र फिरून संबंधितांवर कारवाई करत आहेत.

एकाच वसतीगृहातील ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण !

शहरातील एम्.आय.डी.सी. परिसरातील एका वसतीगृहातील एका मुलीला कोरोनाची लागण झाली होती. या मुलीच्या संपर्कात आलेल्या अन्य ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

एक देशभक्त म्हणून चांगले सरकार देणे, हे माझे काम आहे ! – ई. श्रीधरन्

दिशा रवि अशा गोष्टींमुळे देशाची प्रतिमा मलीन होते याविरोधात तातडीने कारवाई केली पाहिजे.

शेतकर्‍यांच्या आंदोलनासाठी आयोजित काँग्रेसच्या ‘जन आक्रोश सभे’त हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य

काँग्रेसची ‘जन आक्रोश सभा’ ! मंचावर नर्तकींकडून हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य ! या वेळी मंचावर पक्षाच्या काही महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आणि त्यांच्यासमोर हे नृत्य चालू होते. काँग्रेसला शेतकर्‍यांविषयी किती प्रेम आहे, हे स्पष्ट होते !

झोपी गेलेला हिंदु समाज जागा होईल, त्यावेळी तो सगळे जग प्रकाशमान करील ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आज देशात कुणीही परदेशी नाही. सगळे जण हिंदु पूर्वजांचेच वंशज आहेत. कुणी आपल्याला पालटेल याची भीती नाही; पण या गोष्टी आपण विसरून जाऊ, याची भीती आहे.

पुदुच्चेरीतील काँग्रेसचे सरकार बहुमताअभावी कोसळले

काँग्रेसने अनेकदा आमदार, खासदार यांची फोडाफोडी केली आहे, त्याविषयी नारायणसामी कधी का बोलले नाहीत ?

उत्तरप्रदेश सरकारच्या अर्थसंकल्पात अयोध्येसाठी ४०४, तर काशीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद

श्रीरामजन्मभूमी मंदिरापर्यंत पोचण्यापर्यंतच्या मार्गासाठी ३०० कोटी, तर अयोध्येच्या विकासासाठी १०४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज काशीमध्ये पर्यटन विकासासाठी १०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहे.

केरळ सरकार ‘लव्ह जिहाद’कडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत आहे ! – योगी आदित्यनाथ

हिंदुद्वेषी केरळमधील साम्यवादी सरकारकडून वेगळी अपेक्षा काय करणार ? केंद्र सरकारनेच आता लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कृती करण्यासाठी संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

हे शेतकरी आंदोलन नसून देशविरोधातील एक युद्ध ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष चर्चासत्रांतर्गत ‘शेतकरी आंदोलन कि देशविरोधी षड्यंत्र ?’ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद