एक देशभक्त म्हणून चांगले सरकार देणे, हे माझे काम आहे ! – ई. श्रीधरन्

ई. श्रीधरन् व दिशा रवि

थिरूवनंतपूरम् (केरळ) – एक देशभक्त म्हणून चांगले सरकार देणे आणि देशाच्या एकतेला अन् सुरक्षेला बाधा पोचवणार्‍या विषयांच्या संदर्भात कठोर करावाई करणे हे माझे काम आहे, असे मत भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन् यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले.

शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारे ‘टूलकीट’ शेअर केल्यामुळे दिशा रवि या कथित पर्यावरणवादी तरुणीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यावर ई. श्रीधरन् म्हणाले की, अशा गोष्टींमुळे देशाची प्रतिमा मलीन होते. अशा गोष्टींच्या विरोधात तातडीने कारवाई केली पाहिजे. मी त्यांना कारागृहात टाका, असे म्हणत नाही; मात्र देशाच्या सन्मानाला हानी पोचवणार्‍यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे.