अकोला येथे संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासह पेट्रोल पंपांवर गर्दी

प्रातिनिधिक छायाचित्र

अकोला – कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्ह्यात २३ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. जीवनावश्यक वस्तू आणि पेट्रोल पंप वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. असे असतांनाही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असून पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सामाजिक अंतर पाळले जात नाही. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद असली, तरीही काही जणांनी ही दुकाने चालू केली आहेत. त्यामुळे अशा दुकानांवर महापालिका प्रशासन, पोलीस आणि महसूल विभागातील कर्मचारी एकत्र फिरून संबंधितांवर कारवाई करत आहेत. संचारबंदीचे नियम भंग करणार्‍यांवर कारवाई होत असल्याने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.