चिकित्सालये बंद ठेवून नागरिकांची असुविधा करणार्‍या डॉक्टरांचे अनुमतीपत्र रहित करावे ! – मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे निर्देश

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि पालिका प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे; मात्र झोपडपट्टी अन् वसाहती यांच्या परिसरात अनेक खासगी चिकित्सालयेे जाणीवपूर्वक बंद ठेवून नागरिकांची असुविधा केली जात आहे. अशा दायित्वशून्य डॉक्टरांचे अनुमतीपत्र रहित करावे

अत्यावश्यक सेवांच्या वाहनांतून प्रशासन आणि पोलीस यांची दृष्टी चुकवून आपल्या मूळ गावी जाणारे कह्यात

देशात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दळणवळण बंदी घोषित केलेली असतांना पोलीस आणि प्रशासन यांची दृष्टी चुकवून आपल्या मूळ गावी जाणार्‍यांची संख्या वाढली आहे.

श्री सिद्धीविनायक देवस्थान राबवणार रक्तसंकलन अभियान

कोरोना रोगाच्या पार्श्‍वभूमीवर श्री सिद्धीविनायक गणपति मंदिर न्यासाच्या वतीने रक्तसंकलन अभियान राबवण्यात येणार आहे. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर याविषयी म्हणाले की, मुंबईत रहाणार्‍या ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांनी स्वत:चे नाव श्री सिद्धीविनायक मंदिरात सकाळी १० ते…

पोलीस असल्याचे सांगून नागरिकांना लुटणार्‍या तिघांना अटक

पोलीस असल्याचे सांगून संचारबंदीचे उल्लंघन केल्याची भीती दाखवून करवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी करणार्‍या ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नाशिकमध्ये जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक आणि भाववाढ करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार ! – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

जीवनावश्यक वस्तूूच्या विक्रेत्यांनी त्यांची दुकाने चालू ठेवावीत. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना मालाची साठवणूक करणे, वस्तूंची भाववाढ अथवा विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही. असे करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल…

कोरोनाच्या भीतीने मुंबई सोडणार्‍या परप्रांतियांना पोलिसांनी पकडले

कोरोनाच्या भीतीमुळे अनेक परप्रांतीय मुंबई सोडून जात असल्याचे पोलीस पडताळणीत आढळून येत आहे. २८ मार्च या दिवशी पालघर येथून दुधाच्या टँकरमधून राजस्थान येथे निघालेल्या १२ नागरिकांना कल्याण येथे पोलिसांनी पकडले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण विभागात ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन

शासनाच्या सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधासाठी कोकण विभागाने पाचही जिल्ह्यांत आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि नियोजन केले आहे. राज्यात प्रथमच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य, फळे, भाजीपाला यांच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष)…

दिंडोरी (नाशिक) येथे अवैध मद्यसाठा जप्त

दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव शिवारात आंबे दिंडोरी रस्त्यावर असलेल्या एका ‘हॉटेल’वर धाड टाकून ४ सहस्र ६४१ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण चालू आहे.

शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार १ मासाचे मानधन मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देणार ! – खासदार संजय राऊत

कोरोनाविरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा म्हणून शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक मासाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे.

कोरोना रुग्णांविषयी अफवा पसरवल्याप्रकरणी नागपूर, रायगड, पुणे येथे ८ जणांवर गुन्हा नोंद

कोरोनाविषयी जनजागृती करून समाजातील लोकांना साहाय्य करण्याऐवजी समाजात अफवा पसरवून लोकांना भयभीत करणारे समाजद्रोहीच आहेत ! त्यामुळे अफवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी !