औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेक्षाध्यक्ष, भाजप

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हे राजकीय किंवा निवडणुकीचे सूत्र नसून तो आमच्या श्रद्धेचा विषय आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मागणी शिवसेनेने लावून धरावी.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना ‘सनातन पंचांग’ भेट

सनातन आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असल्याची प्रतिक्रिया गृहराज्य मंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने औरंगाबादचे नामकरण करायला माझे समर्थन आहे ! – खासदार संभाजीराजे छत्रपती  

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने औरंगाबादचे नामकरण होत असेल, तर त्याचे स्वागत करायला पाहिजे. औरंगाबादचे नाव पालटण्यासाठी माझे समर्थन आहे, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा डी.लिट.ने सन्मान होणार

देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने मानद डी.लिट. पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

नाशिक येथील मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एस्.टी.वर छत्रपती संभाजीनगरचे फलक लावून आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एस्.टी.बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक लावत आंदोलन केले.

औरंगाबादच्या नामांतराविषयी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

औरंगाबादच्या नामांतराषियी महाविकास आघाडीत मतभेद नाहीत.

अहमदनगरचे अंबिकानगर नामांतर करा ! – सदाशिव लोखंडे, खासदार, शिवसेना

औरंगाबादच्या नामांतराचा जुना वाद पुढे आल्यानंतर आता शिर्डी येथील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्यात यावे, अशी मागणी ३ जानेवारी या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केली.

विरार (जिल्हा पालघर) येथील सनातनच्या साधिका सौ. सुनीता राजपूत (वय ६५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

२९ डिसेंबर २०२० या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी ही आनंदवार्ता ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून दिली.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दोडामार्गच्या वतीने ३१ डिसेंबरला पारगड किल्ल्यावर १२० जणांचा खडा पहारा

किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी प्रयत्न करणार्‍या शिवप्रेमींचे अभिनंदन ! जे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्या लक्षात येते, ते प्रशासनाच्या लक्षात का येत नाही ? प्रशासन गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी प्रयत्न का करत नाही ?

बचतगटांच्या २२ लाख रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी दोन बचतगटाच्या तीन महिलांना पोलीस कोठडी 

शासनाकडून बचतगटांना काम दिले जाते तसेच त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो, असे असतांना भ्रष्टाचार करून बचतगटाच्या मूळ संकल्पनेलाच सुरूंग लावणार्‍यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !