
नगर – औरंगाबादच्या नामांतराचा जुना वाद पुढे आल्यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी होत आहे. शिर्डी येथील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्यात यावे, अशी मागणी ३ जानेवारी या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केली. औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यासंबंधी आमचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील; मात्र औरंगाबादपाठोपाठ अहमदनगरचेही नामांतर होऊन या शहराला ‘अंबिकानगर’ नाव देण्यात यावे, अशी आमची मागणी असल्याचे खासदार लोखंडे यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून अहमदनगरच्या नामांतराची मागणी चालू आहे. अर्थात त्यावरून काहींमध्ये मतभेद आहे. काहींनी ‘अंबिकानगर’, तर काहींनी ‘आनंदनगर’ नाव सुचवले आहे. ‘अंबिकानगर’ नाव देण्याची मागणी जुनी आहे. यावरून अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. नगरला यापूर्वी भरलेल्या ७० व्या साहित्य संमेलनातही हे सूत्र उपस्थित झाले होते.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक