उसगाव वडाकडे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन ठार

उसगाव वडाकडे येथे एका अज्ञात वाहनाने १८ नोव्हेंबर या दिवशी सकाळी एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचा चालक पाळी येथील चंद्रकांत धाली आणि मागे बसलेली पाळी येथील आलिशा फर्नांडिस यांचे जागीच निधन झाले.

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे निधन

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा (वय ७८ वर्षे) यांचे १८ नोव्हेंबर या दिवशी बिहार येथे वृद्धापकाळाने निधन झाले. सौ. मृदुला सिन्हा यांनी वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत गोव्याचे राज्यपालपद भूषवले होतेे.

गोव्यात नवीन ‘मोटर वाहन कायद्या’ची कार्यवाही १ जानेवारीपासून

गोव्यात नवीन ‘मोटर वाहन कायद्या’ची १ जानेवारी २०२१ पासून कार्यवाही करण्यात येणार आहे. ही दिनांक आणखी पुढे ढकलता येणार नाही, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली.

काँग्रेसने हकालपट्टी केलेले उर्फान मुल्ला यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसने १७ नोव्हेंबर या दिवशी पुढील ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केलेले काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे माजी प्रमुख उर्फान मुल्ला यांनी त्यांच्या समर्थकांसह १८ नोव्हेंबर या दिवशी भाजपात रितसर प्रवेश केला.

सर्व शासकीय संकेतस्थळे १ जानेवारीपासून पूर्णतः कार्यान्वित होतील !  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

येणार्‍या आपत्काळाच्या दृष्टीने गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

गोमातेच्या रक्षणासाठी शासनाचे सहकार्य असेल !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यात धवलक्रांती आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी गोधन वाढवण्यावर भर दिला जात आहे.

राज्य मंत्रीमंडळात पालट करणे, ही काळाची आवश्यकता !

पर्यटन क्षेत्रातील विविध घटक पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्यावर नाराज झालेे आहेत.

(म्हणे) ‘आप सत्तेवर आल्यास ७३ टक्के गोमंतकियांना विनामूल्य वीज मिळेल !’ – राघव चढ्ढा, आपचे देहलीतील आमदार

जनतेला फुकटे बनवणारे नव्हे, तर स्वावलंबी आणि उद्योगी बनवणारे राज्यकर्ते हवेत !

गोवा शासनाने म्हादई, कोळसा या आणि इतर प्रकल्पांविषयी श्‍वेतपत्रिका काढावी !  काँग्रेसची मागणी

राज्यकर्त्यांनी लोकांना काय पाहिजे ते नव्हे, तर लोकांसाठी काय आवश्यक आहे, ते द्यायचे असते !