उसगाव वडाकडे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन ठार

फोंडा, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – उसगाव वडाकडे येथे एका अज्ञात वाहनाने १८ नोव्हेंबर या दिवशी सकाळी एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचा चालक पाळी येथील चंद्रकांत धाली (वय २० वर्षे) आणि मागे बसलेली पाळी येथील आलिशा फर्नांडिस (वय २१ वर्षे) यांचे जागीच निधन झाले. धडक दिलेल्या वाहनासह चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी अनोळखी वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवला.